कोणाला तरी २ शब्द सांगावे म्हणतो
मनातले गुपित उलगडावे म्हणतो
हे ऐकण्या साठी तू येशील का
माज्याशी २ शब्द बोलशील का?
शब्दांच्या साखलित मी बांधलेला
शब्दांच्या कोडयात मी हरवलेला
शब्दांची साखली तोडन्यास तू येशील का
माझ्याशी २ शब्द बोलशील का?
शब्दांचा वर्षाव मज़वर होत आहे
शब्दांचे तीर मला टोचत आहेत
या शब्दन साठी तू माझी ढाल होशील का
माझ्याशी २ शब्द बोलशील का?
शब्दांच्या चक्रव्युवातला अभिमन्यु मी
चक्रव्युवा मधे प्रवेश तर केला आहे,
बाहेर येण्या साठी हात देशील का?
माझ्याशी २ शब्द बोलशील का?
आयुष्यातील झाडावरचे शब्द वेचत आहे
हे शब्द कागदावर उतरवत आहे
या साठी तू माझी लेखनी होशील का?
माझ्याशी २ शब्द बोलशील का?
आज न उद्या तू येशील
ही एक आस!
शब्दांच्या घावावर तूच औषध,
हा माझा विश्वास!
@BHI©2009