Showing posts with label मी एक शब्द. Show all posts
Showing posts with label मी एक शब्द. Show all posts

Tuesday, June 23, 2009

मी एक शब्द!

मी माझा शब्द
शब्द माझा मित्र
मित्र हा एक शब्द
शब्द माझे प्रेम
आणि प्रेम, हां पण एक शब्द !

सूचित हा शब्द
नंदाई हा एक शब्द
अनिरुद्ध हा पण शब्द
पण,या सर्वां साठी "आई" हा शब्द

मधुफलवाटिका हा एक शब्द

प्रत्यक्ष हा सुद्धा शब्द
गुरुक्षेत्रम हा एक शब्द
पण, हे सर्व अनिरुद्ध-शब्द


नभांगनातला ध्रुव हा एक शब्द
कवि च्या कविते मधला मी एक शब्द
तुम्ही संबोधलेल्या वाकया मधला मी एक शब्द
आई च्या हाकेमधला मीच तो शब्द

शब्दांच्या गर्दित मी गुंतलेला
शब्दांच्या माळेत  मी गुम्फ्लेला
शब्दांच्या सुरांचा मी एक शब्द
विराट शब्दांच्या जगातला मी एक शब्द
हो मीच तो शब्द,
मी "अभिजीत"!

शब्दांसाठी शब्द शोधतोय
शब्द शोधूनही सापडत नाही,
शब्द सहजपणे मनात कोरान्याचा प्रयत्न करतोय,
आता शब्द सुचत आहेत पण सूर नाही.

शब्द सूरान्ना ऐकवण्याचा प्रयत्न करतोय,
पण सूर आहे की ऐकतच नाही.
शब्दांच्या फुलांनी सूरांवर साज चढवतोय
पण सूर आणि शब्द काही जुळत नाहित.

----------ब्लू बर्ड-७ ----------