Saturday, June 5, 2010

ब्लू बर्ड



निळ आभाळ
मन माझे त्यात गहाळ

मन माझे वाऱ्या सारखे
जणू पतंगावनी वाऱ्यावर बहरनारे

पंख विशाल विस्तारुनी
आकाशात घेतो भरारी

अथांग गगनात झेप घेणारा
पक्षी मी निला

आयुष्याच्या वाटेवर
वळने आहेत फार

प्रत्तेक वलनावर
रावण रूपी आव्हाने फार

ही आव्हाने पेलन्यास
सोबत हवी ख़ास

मनी माझ्या,खूप काही ध्यास
ते सर्व पूर्ण व्हावेत हीच मनी आस

- अभिजीत

Friday, June 4, 2010

पहिला पाउस

पहिला पाउस




धरणी मातेच्या माझा
घसा आहे कोरडा
पावसाला तुझा
लवकर धाड़ इन्द्रा

शेतकरी सखा
नजर त्याची नभा
तुझा पावसा वरच
तो आहे वसा

थंड हवा
नीले आकाश
मातीचा सुगंध
हा तर पहिल्या पावसाचा गंध



पक्षांची किल बिल
विजेचा कड़ कडाट
घारी ची भीर भीर
पहिल्या पावसाला आम्ही सर्वा आतुर

शालेची घंटा
सांजेची वेळ
सर्वांची ही
घरी जाण्याची वेल



पहिल्या पावसाचा
पहिला थेम्ब
तो टिपन्या साठी
"पाँवश्या " झाला सेट

मातीचा सुगंध
अधिक च तीव्र
पहिल्या पावसाची
हामखास चाहुल

धडाड धूम
धूम धडाड
सोसात्या चा वारा
छप्रांचे वाजले बारा

विजेचा हिरवा सिग्नल
पाण्याची बरसात
तापलेली धरणी माता
झाली थंड

थंड थंड ही हवा
थंड थंड सर्वांची मने
धन्य धन्य ती धरणी माता
धन्य धन्य हे इन्द्र देव

- अभिजीत