Thursday, October 7, 2010

माझे शब्द २



माझ्या आयुष्यातील गाडीला शब्दांचे डबे 
रूळ आहेत त्याला मित्र माझे 
 स्टेशन ज्याला मन त्यांचे   
इंजिन त्याला मन माझे 

दूरच्या प्रवासात जेव्हा एकटा असतो
माझ्या सोबत फ़क्त, शब्द माझा असतो 
हा शब्द जेव्हा (मनाच्या स्टेशन मधून) कागदावर उतरतो 
जाताना पुन्हा मला एकटा करुण जातो 

शब्दश्रींच्या तीरावर शब्दांच्या लाटा  
भिडतात जेव्हा हृदयाला माझ्या 
शब्द तेव्हा घेतात कम्पनांची जागा
स्पंदनाची होते  जाणीव  तेव्हा 

गुम्फलेले शब्द अलगद सोडवताना 
शब्दात भावना नकळत गुम्फुन जातात 
मग झंकार जरी ऐकू आले 
तरी कल्पना त्या शब्दात विर्घलुन जातात

हरवलेल्या शब्दांना  
शोधण्या साठी गेलो 
शब्द जेव्हा भेटले 
तेव्हा मीच त्यांच्यात हरवून गेलो 

शब्दांशी लपंडाव खेलताना 
आधी फार मजा येते 
पण ते शब्दच हरवल्या वर 
मग त्यांची किम्मत कलते 
- BlueBird