आभाळ भरून येत होते
सर्वत्र पसरली होती हिरवाई
फुलपाखरू त्यावर उडत होते
स्पर्श मनाला गारव्याचा (झाला)
भिरभिरून ते उडत होते
तिकडून आला वारा
फुलांचा आसरा ते शोधत होते
मनाला थंडावा देणारा वारा
खलनायका सारखे भासत होते
फुलांच्या मागे दडलेलं पाखरू
आणखीन फुलांच्या कुशीत शिरत होते
मातीचा सुगंध दरवळला
पाखराचे प्रेम फुलावर जडत गेले
काही क्षणांसाठी ते पाखरू
त्या फुलांमध्ये भान हरवून गेले
क्षणिक फुलाचे सुगंध
आसमंतात दरवळून गेले
किती भोळे ना हे पाखरू
त्या फुलात धुंद हरवून बसले
तिकडून आला मोर
फुलावर तो झेप घेणारच होते
हिरव्या पानावर बसून
फुलपाखरू ते रडत होतं
- अभि