Sunday, December 13, 2009

मी मराठी?


कांदा आणि भाकरी खातो आम्ही,
उसाला भाव मिळावा म्हणून रडतो आम्ही,
दिवसातून सोंला तास अंधारात असतो आम्ही ,
पाण्यासाठी वन वन वन फिरतो आंम्ही,
होय मी मराठी, मी मराठी?

खडया तुन रस्ते शोधतो आम्ही,
दिवसा रस्त्यावर लाइट पाहतो आम्ही,
रस्त्या च्या दिव्या मधे अभ्यास करतो आम्ही,
जाहिरात फलका वर फोकस बघतो आम्ही ,
होय मी मराठी, मी मराठी?

साखरे च्या उत्पादनात अग्रेसर आम्ही,
आणि साखरेलाच ५० रु मोजतो आम्ही ,
समोरचा माणूस मेला तरी चालेल,
पण त्याला मराठीच बोलावे लागेल,
अहो मीच तो मराठी,मी मराठी ?

मराठी उमेद्वाराला निवडून देतो आम्ही ,
आणि त्यांच्याच कुस्त्या सभेत बघतो आम्ही ,
पुतल्यासाठी सिक्यूरिटी गार्ड्स ठेवतो आम्ही ,
दुश्कालात आत्महत्या करतो आम्ही
होय मी मराठी! मीच तो मराठी?


 "काश्मीर" या नावा वरुण जर एकत्र येतो "आम्ही "
तर फ़क्त "मराठी" वरुनच देशापासून का वेगले होतो आम्ही?
बुदधीबलाच्या पटावरील प्यादी तर नाहित ना आम्ही?
हे एकदा स्वतः च्या मनाला विचारा ना तुम्ही !

अहो, "साहेब"
"
आबा,दादा जरा आमचा कड़ेपण एकदा बघा तुम्ही!
आमचे "पालक"आहात राव "तुम्ही"!

----------ब्लू बर्ड-७ ---------








No comments:

Post a Comment