Wednesday, February 23, 2011

जास्मीन रीवोलुषण

"जास्मीन रीवोलुषण " नावावरून असे वाटते  कि जसे काय एखाद्या फुलाची पोट जात विकसित होण्याची एक पद्धत आहे, एखाद्या झाडाच्या अथवा बीजाचे नवीन नाव आहे, हे एक बीज तर आहे, परंतु रोपाचे अथवा झाडाचे नाही तर लोकशाहीचे बीज रोवण्याचे.  ज्याचे अंकुर आता अरब आणि अखाती देशामध्ये फुटण्यास सुरुवात झाली आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला गेल्या 2-३  महिन्यातला अरब देशातल्या घडामोडी समजून घ्यायला हव्यात. 
ट्युनिशिया देशातील "सीडी बौझीद " या शहरामधून सरकार विरोधी आंदोलनाची जी चळवळ सुरु झाली तिला सीडी बौझीद रीवोल्त असे संबोधले जाते आणि अंतरराष्ट्रीय मिडिया  याला "जास्मीन रीवोलुषण असे संबोधते. 
'झीएद  एल  हानी" या ट्युनिशिया मधील पत्रकाराने प्रथम जास्मीन रीवोलुषण हा शब्द त्याच्या ब्लॉग मध्ये १३ जानेवारी  ला वापरला आणि मग हळू हळू तो फेसबुक ट्वीटर द्वारे  प्रसिद्ध झाला. 
        मोहम्मद बौअझीझी हा २६ वर्षीय तरुण सीडी बौझीद मध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा. तो त्याच्या घरामध्ये एकटा कमावणारा होता. त्याच्या कडे हा धंदा करण्याचा परवाना नव्हता. जेव्हा एका पोलीस महिलेशी त्याचे या संबंधी जोरदार भांडण झाले, बौझीझी ला हा प्रकार काही नवीन नव्हता तेव्हा त्याने १० दिनार दंड भरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पोलीस महिलेने याच्या गालात चापट मारली आणि त्या पोलीस महिलेने याच्या वडिलांबद्दल अप शब्द वापरले.  अपमानित बौझीझी, तेव्हा महापालिकेच्या कारल्यात तिची तक्रार नोंदवायला गेला, पण त्याची तक्रार  कोणी हि नोंदवून घेतली नाही आणि त्याच्या तक्रारी कडे दुर्लक्ष केले, कोणाला काहीच सूचित करण्या आधी बौझीझी ११.३० ला पुन्हा कार्यालयात आला, त्याने ज्वालाग्राही  पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. ४ जानेवारी २०११ ला त्याच्या मृत्यू झाला. याच्या वर झालेल्या अन्यायाविरुद्ध काही लहान आणि काही मोठे मोर्चे निघाले, आणि इथूनच सुरुवात झाली सीडी बौझीद रीवोल्त ला, म्हणजेच "जास्मीन रीवोलुषण". हे तर एक निमित्त होते, यातूनच स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि त्याची बीजे जनसामान्यात  रोवू लागली. 
           जेव्हा या बीजांना अंकुर फुटले तेव्हा ट्युनिशिया चे अध्यक्ष "झिने  एल  अबिडीने  बेन आली" यांना देश सोडून जायची वेळ आली आणि अखेरीस त्यांना पदत्याग करावा लागला. या देशात हा रोग थंड होतो न होतो तोच इजिप्त मध्ये याचा संसर्ग झाला, स्वाईन फ्लू  जेवढ्या वेगात नाही पसरला तेवढ्या वेगात हे "जास्मीन रीवोलुषण" पसरत गेले, आणि अखेरीस २५ वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेवर असणारया  होस्नी मुबारक या इजिप्त च्या सर्वे सर्वा  ला सुद्धा पद त्याग करावा लागला. ११ फेब्रुवारी ला ते पायउतार झाले, आणि तोच जोर्डन च्या  राजाने, नवीन पंतप्रधानाची घोषणा केली, सुदानच्या अध्यक्षांनी घोषणा केली कि  ते २०१५ ची निवडणूक लढवणार नाहीत, तशीच घोषणा येमेन च्या "आली सालेह" यांनी केली, आणि यामुळे या आंदोलनाला आणखीनच व्यापक रूप मिळाले.  लिबिया मधल्या घडामोडी आणि गद्दाफी सरकारच्या बातम्या आपण सर्व प्रत्यक्ष मध्ये वाचत तर आहोतच, आता फक्त वाट बघायची आहे कि इजिप्त नंतर लिबिया येतो कि आणखीन कोणी. आता तर याची शक्यता  जास्त वाढली आहे कि २०११ च्या नोबेल पुरस्कारा  साठी या सर्व आंदोलकांना नामांकन मिळेल, मग तेव्हा नवल वाटून घेवू नका. 
         याची व्याप्ती आणि प्रभाव येवढा भयंकर आहे  कि आक्खे  अरब जगात, पश्चिम आशिया,  आणि चीन ला सुद्धा याने आपल्या विळख्यात घेतले.  मोराक्को   ते इराक, गाबोन  ते अल्बानिया, कझाकिस्तान ते इराण आणि पाकिस्तान, आणि चीन पर्यंत हा पोहोचला. चीन मध्ये या आधी पण असे प्रयोग झालेले  आहेत, तियानमेन चौक तर आपणाला आठवत असेनच, आणि नेहमी प्रमाणे चीन ने सर्व मिडिया वर  जो "जास्मीन रीवोलुषण ला आपल्या बातम्या मध्ये स्थान देईन त्यांच्या वर बंदी आणलेली आहे (विकिपीडिया).  एक विशेष बाब इथे नोंद करावी लागेन कि या चळवळीला अल कैदा सारख्या आतंकवादी संघटनांनी पाठींबा दर्शिवला आहे, हि बाब निश्चितच फक्त अरब जगतासाठी नव्हे तर सर्व जगासाठी चिंतेची बाब आहे. लोकशाही ची फळे हि त्या त्या देशातील नागरिकांनीच चाखायला हवीत इतर कोणी तिसऱ्या ने त्याच्या फायदा घेऊ नये विशेष करून आतंकवादी संघटना आणि काही "व्यायसायिक राष्ट्रे" जी स्वतःचा "उद्योग" वाढवण्यासाठी  (मग तो शस्त्र असो अथवा तेलाच्या साठ्यावरील नियंत्रण) टपुन बसलेली असतात.  यासाठी संयुक्त राष्ट्राने आणि स्वतः भारताने यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आपले आंतरराष्ट्रीय जगता मधले नेतृत्व सिद्ध करून आपण संयुक्त राष्ट्रा सदस्यत्व पासून का दूर आहोत हे छाती ठोक पने  सर्व जगताला विचारावे, आणि आपले सदस्यत्व  बळकट करावे.
  या सर्व  गोष्टींमध्ये जाणून उल्लेख करावा लागेल तो इंटरनेट चा आणि अर्थातच मग फेसबुक आणि सोशल नेटवोर्किंग वेब आणि ब्लॉग चा, या स्वातंत्र्याच्या चळवळी मध्ये इंटरनेट ने सर्वात महत्वाची भूमिका दळण वळणाची आणि सर्वांना एकत्र आणण्याची बजावली. तेव्हा या काही घटना पासून बोध घेत आजच्या तरूणाइने ब्लोंग सारख्या प्रभावी माध्यमांचा उपयोग आपले मत मांडण्यासाठी प्रभावीपने करावा.  

भारतावर याचा प्रभाव 

  तसे पहिले तर भारतासाठी स्वातंत्र्य चळवळ तर काही नवीन नाही, उलट भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची सर्व जगात दाखले दिले जातात. आपल्या कडे हि अशी ज्वलंत-क्रांतीचे उठाव झालेले  आहेत १८५७ चा राष्ट्रीय उठाव असो अथवा आत्ताच मागील काही  वर्षात विद्यार्थ्यांनी केलेला आरक्षणं विरोधात उठाव.
भारत सरकारने या उठवापासून बोध घेत लवकर आपल्या कार्यपद्धती मध्ये सुधारणा घडवून आणायला 
हव्यात जसे विविध घोटाळ्यांमध्ये सरकारी लोक गुंतलेले दिसत आहेत, लवकर यासाठी उपाय योजना अमलात आणायला हव्यात, अथवा भारतामध्ये या  जस्मिन रीवोलूषण चा संसर्ग झाला तर पुन्हा सांगायला नको काय होईन आणि काय नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राष्ट्रकुल स्पर्धेतला घोटाळा, २ जी स्पेक्त्रूम घोटाळा, अशी आपल्याकडे एक मोठी रांगच आहे. त्यातच स्विस बँक मधला काळा पैसा मध्ये मध्ये व डोके काढत असतो, वाढत्या  महगाई ने साधारण माणसाला सळो कि पळो करून सोडले आहे. 
मान्य आहे भारत हि वाढती आर्थिक बाजारपेठ आहे आणि उभरती आर्थिक महासत्ता, पण या महासत्तेचा जर साधारण खेड्या पाड्यांनाच "अर्थ" उमगला नाही तर या महासत्तेचा काय उपयोग?  आता साधारण माणसाच्या सय्यमाची   "कोणी" परीक्षा घेवू नये, ६० वर्षापूर्वी इंग्रजांविरुद्ध उठाव झालेला होता, आताचा जनसमुदाय हा मानसिक दृष्ट्या अतिशय विकसित आहे, "आजच्या भाषेत सांगायचे झाले तर १५० वर्षाचा  स्वातंत्र्य  चळवळीचा "एक्सपेरीयंस" आमच्या पाठीशी आहे."


- अभिजित जोशी


No comments:

Post a Comment