Saturday, May 16, 2026

शब्दांच्या दुनियेत

शब्दांत जळती वेदना, ओठांवर हास नवं,
पिंड माझा कवी असा, जगण्याचा ध्यास नवं।
_

दुःखाच्या त्या वाळवंटी, उरला फक्त श्वास नवं,
कोरड्याही काळजात उमटे, आशेचा भास नवं।


धिंड निघाली गावातून, मिळाला किती त्रास नवं,
तरीही माझ्या ओठी राहे, स्वाभिमान सुवास नवं।

_
‘अभि’ शब्दांच्या दुनियेत, चालत राहे प्रवास नवं
तेव्हा प्रत्येक श्वासातून, जन्मतं पुन्हा नवं।

अभिजीत Abhijeet 

Thursday, May 14, 2026

शब्द



शब्दश्रींच्या तीरावर शब्दांच्या लाटा,
भिडतात जेव्हा हृदयाला माझ्या।
शब्द तेव्हा घेतात स्पंदनांची जागा,
भावनांची होते जाणीव तेव्हा॥

गुंफलेले शब्द अलगद सोडवताना,
भावनाही नकळत गुंफून जातात।
झंकार जरी ऐकू आला अंतरी,
कल्पनाही शब्दांत विरघळून जातात॥

हरवलेल्या शब्दांना शोधत मी गेलो,
शब्द जेव्हा भेटले वाटेमध्ये।
तेव्हा नकळत मीच हरवून गेलो,
त्यांच्या त्या गूढशा विश्वामध्ये॥

शब्दांशी लपंडाव खेळताना आधी,
फारच मजा वाटत राहते।
पण शब्दच जेव्हा हरवून जातात,
तेव्हा त्यांची खरी किंमत कळते॥

अभिजीत